संजय सावकारेंच्या स्वागतासाठी उधळल्या नोटा

June 14, 2013 9:17 AM1 commentViews: 929

sanjay savkare_welcomeभुसावळ 14 जून : राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते प्रथमच शहरात आले. त्यावेळेस भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत पैसे उडवून केलं.

त्यानंतर त्यांची भुसावळमध्ये जंगी मिरवणुकही काढण्यात आली. सावकारे यांच्याकडे कृषी आणि जलसंधारण खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. भास्कर जाधव यांनी शाही विवाह केला होता तेव्हा राष्ट्रवादीचे शरद पवारांची झोप उडाली होती.

आता बुलढाण्यात त्यांच्या पक्षाचे नवे मंत्री संजय सावकारे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नोटा उधाळल्या आहे यावर पवार साहेब काय करतील असा सवाल शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी उपस्थित केला आहे.

  • Sachin Nalawade

    This is very common in villages, tv reporters and politicians from city might feel it something amazing! leave it. Show some good imp news…

close