रमेश यांनी केली मोदींची तुलना भस्मासुराशी

June 14, 2013 8:37 AM0 commentsViews: 290

ramesh on modiनवी दिल्ली 14 जून : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी राजकीय आव्हान ठरू शकतील असं केंद्रीय ग्राम विकासमंत्री जयराम रमेश यांनी मान्य केलं आहे.

मोदी यांची भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून निवड झाल्यापासून प्रथमच एखाद्या काँग्रेस नेत्यानं मोदी यांचं आव्हान मान्य केलंय. मात्र, त्याचवेळी त्यांनी मोदींची तुलना भस्मासुराशी केली. मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले फॅसिस्ट नेते आहेत अशी टीकाही रमेश यांनी केली.

close