म्हाडाच्या घरांवरून राजकारणास सुरुवात

January 13, 2009 11:18 AM0 commentsViews:

13 जानेवारी, मुंबईम्हाडाची 80 टक्के घरं मराठी माणसांना देण्याची मागणी चुकीची असल्याचं समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने कोणत्याही दबावात असा निर्णय घेऊ नये, असं ते म्हणाले. शिवसेनेच्या दबावात येऊन सरकारनं ही मागणी मान्य केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही अबू आजमी यांनी दिला आहे.सर्वसामान्यांना परवडणारी घरं, असं म्हडाच्या घरांचं वर्णन करण्यात येतं. म्हडाची 3863 घरं तयार असून त्यांच्या विक्रीसाठी फॉर्म वाटपास सोमवारी सुरुवात झाली. आपलं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सकाळी पाचपासून अर्ज घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लॉटरी पद्धतीनं या घरांचं वाटप होणार आहे.मात्र म्हाडाच्या घरांपैकी 80 टक्के घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी शिवसेनेनं आपल्या 'सामना' या मुखपत्रातून केली. यानंतर राज ठाकरे यांनी त्यावर कडी करत 100 टक्के घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या राजकारणात आता अबू आजमीही उतरल्यानं हे प्रकरण चांगलच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

close