महिंद्रा अँड महिंद्राची नवी कार बाजारात

January 13, 2009 11:20 AM0 commentsViews: 10

13 जानेवारी, नाशिकमहिंद्रा अँड महिंद्राची नवी कार 'झायलो' आज नाशिकमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे एम. डी आनंद महिंद्र आणि इतर उच्चस्तरीय अधिकारही उपस्थित होते. गेल्यावर्षी 'स्कॉर्पिओ'चं धूमधडाक्यात लॉन्चिंग केल्यानंतर महिंद्रा कंपनीनं त्यांची ही दुसरी कार मार्केटमध्ये आणलीय. ऑटो इंडस्ट्रीत सध्या मंदी असतानाही महिंद्रनं ही नवी कार मार्केटमध्ये उतरवलीय हे विशेष आहे. या कारची किंमत सुमारे सहा लाख चोवीस हजार ते सात लाख एकोणसत्तर हजार असेल. या कारमध्ये 112 बीएचपी क्षमतेचं सीआरडीई इंजिन आहे. सध्या मार्केटमध्ये लोकप्रिय असणार्‍या टोयोटाच्या इनोवासाठी ही नवी झायलो चांगलीच स्पर्धा ठरू शकेल.

close