वरूणराजा पश्चिम महाराष्ट्रावर बरसला, मराठवाड्यावर रूसला

June 14, 2013 6:37 PM0 commentsViews: 573

rain mumbaiमुंबई 14 जून : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यभरात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावलीय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नागपूरसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोल्हापुरात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. राधानगरी आणि चांदोली धरणक्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. ठाण्यात पावसामुळे मुख्य ठिकाणी आणि सखल भागांत पाणी साचलं होतं.

 

पण उंच ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत एकूण 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय.

 

मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम विदर्भात पावसाची प्रतीक्षा सुरुच आहे. दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. लातूर शहर वगळता कुठेही पावसानं आज दमदार हजेरी लावलेली नाही. औरंगाबाद जिल्हा आणि परिसरात पावसाची प्रतिक्षा आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हयात ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची चिन्ह नसल्यानं शेतकरी चिंचेत आहे.

रघुवीर घाटात दरड कोसळली

रत्नागिरीत रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी लावलीय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, खेड परीसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रघुवीर घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे खेड-अकलपे सातारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे 14 गावांचा संपर्क तुटला आहे.

close