सरकारी जमिनीवर हॉस्पिटलचा डल्ला !

June 14, 2013 7:47 PM0 commentsViews: 255

प्रवीण मुधोळकर,नागपूर

nagpur wockhardनागपूर 14 जून : इथल्या उत्तर अंबाझरी मार्गावरच्या सरकारी जागेच्या वापराबद्दल वाद निर्माण झालाय. हिंदी भाषेच्या प्रसारासाठी देण्यात आलेली ही जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक उपयोगासाठी वोखार्ड हॉस्पिटलला देण्यात आल्याचा आरोप होतोय. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून ने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

नागपुर सुधार प्रन्यासाने हिंदी भाषेच्या प्रसारासाठी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे या संस्थेला नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्गावरची सरकारी मालकीची एक एकर जागा 2007 मध्ये 30 लाख रुपये शुल्क आकारून 30 वर्षांसाठी दिली होती.

मुळात ‘सार्वजनिक जागा’ असे आरक्षण असतांना किरकोळ बदल करून ती वोखार्ड हॉस्पिटलला ही जागा व्यवसायिक कारणांसाठी देण्यात आल्याने वैधानिक तरतुदींचा भंग झाला असल्याचा आरोप करण्यात येतोय.

दरम्यान, या सदंर्भात राष्ट्रभाषा सभेच्या विभागीय समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी यांनी जागा कमर्शियल वापरासाठी द्यायची किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा दावा केलाय. आता या सगळ्या बाबतीत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

close