‘रक्तदान करा, जीवन वाचवा’

June 14, 2013 8:28 PM0 commentsViews: 217

bload donetरोहन कदम, मुंबई

मुंबई 14 जून : आज 14 जून म्हणजे “जागतिक ब्लड डोनर डे”.नैसर्गिक संकटं असतील, अपघात असतील किंवा दहशतवादी हल्ले अशा वेळेस रक्ताची गरज ही नेहमीच भासते. जागरूक नागरीक हे मोठयाप्रमाणात रक्तदान करतातही पण अजूनही रक्तदानाविषयी अनेकांना प्राथमिक गोष्टीसुद्धा माहिती नसतात.

पोलीस दलात काम करणारे रविंद्र पाटील हे गेली 17 वर्ष नियमित रक्तदान करतायत. त्यांच्याप्रमाणे आपणही वयाच्या 18 व्या वर्षापासून ते 65 व्या वर्षापर्यत रक्तदान करू शकतो.

नियमित रक्तदान करणार्‍यांना आपल्या शरीराला कुठलाही त्रास होत नाही. मात्र रक्तदान करण्यापूर्वी आपल्या प्रकृती  विषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं हे गरजेचं असतं. चला तर मग आज आपणही आपल्या घराजवळच्या सरकारी किंवा प्रायव्हेट ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करूया…….

close