म्हडाचे बनावट फॉर्म विकणारे भामटे अटकेत

January 13, 2009 1:15 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी, मुंबईम्हाडा सदनिकांचे बनावट अर्ज विकणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. दहिसर पोलिस आणि म्हाडाच्या विजिलेंस विभागाने मिळून ही करवाई केली. रमेश कुमार त्रिपाठी आणि राकेश शर्मा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून40 डुप्लिकेट फार्म जप्त करण्यात आले आहेत. तसंच 40 हजार रुपयांची रोख रक्कमही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. हे दोघेजण एका फॉर्मसाठी 2 ते 20 हजार रुपये घेत होते. तसंच 'तुमचं नाव म्हाडाच्या लॉटरीत येईल' असं फॉर्म घेणार्‍यांना सांगत होते. या दोघांचे आणखी दोन साथिदार फरार असल्याची माहिती मिळाली आहे. दहिसर पोलीस त्यांच्या इतर 2 साथिदारांचाही शोध घेत आहेत.

close