अखेर भाजप-जेडीयू युती तुटणार?

June 14, 2013 10:38 PM0 commentsViews: 421

jdu bjpनवी दिल्ली 14 जून : भाजप आणि जेडीयूची गेल्या 18 वर्षांची युती तुटणार हे आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांना तसं कळवल्याची माहिती आयबीएन नेटवर्कला मिळाली आहे. भाजपने त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला.

पण, नरेंद्र मोदींचं प्रचार प्रमुख बननं आपल्याला राजकीयजदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं, हे नितीश कुमारांच्या लक्षात आलंय. त्यामुळेच येत्या निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडायची हा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आहे. याबद्दलची औपचारिक घोषणा रविवारी होण्याची शक्यता आहे. पाटण्यात जेडीयूच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची रविवारी बैठक बोलवण्यात आलीय. त्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार एक नवीन फेडरल फ्रंट उभारण्याच्या तयारीत लागले आहे. यामध्ये ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सहभागी असतील. नितीशकुमार यांच्या मते या तिन्हीही राज्यांना विशेष दर्जा मिळला पाहिजे. याच मुद्यावर तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र येत आहे. नितीशकुमार या अगोदर बीजेडीच्या रॅलीला पाठिंबा दिला होता. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आज विशेष दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत रॅली आयोजित केली आहे. नितीशकुमार यांनी जेडीयूचे संसदीय सदस्य के.सी.त्यागी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेण्यासाठी पाठवले आहे.

जेडीयूच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जर ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री एकत्र आले तर येणार्‍या निवडणुकीत भाजप अथवा काँग्रेसचे सरकार आले तर सत्ता स्थापनेसाठी फेडरल फ्रंड महत्त्वाची भूमिका बजावतील. आणि आपली मागणी पूर्ण करून घेतील.

दरम्यान, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनी आज जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेतली. आणि या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. तसंच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचीही भेट घेतली. त्यामुळे तिसर्‍या आघाडीसाठी हालचाली वेगात सुरू असल्याचे संकेत मिळताय.

close