एटीएसमध्ये नवीन अधिकार्‍यांची गरज : जयंत पाटील

January 13, 2009 1:19 PM0 commentsViews: 26

13 जानेवारी, मुंबईएटीएसमध्ये नवीन अधिकार्‍यांची भरती करण्याची गरज आहे असं गृहमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. एटीएसमधल्या या भरतीबाबत त्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत एटीएस ऑफिसमध्ये बैठक झाली. त्यावेळी बैठकीत याच मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. मंजूर झालेल्या सर्व सोयीसुविधा एटीएसला मिळत आहेत की नाही ? याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. "एटीएस बळकट करण्याला आमचं प्राधान्य असेल. त्यादृष्टीने एटीएसच्या अडचणी, कामाचं स्वरूप आणि गरजांची मी माहिती घेतली. एटीएसच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. त्यांना लवकरच अत्याधुनिक सुविधा प्रदान केल्या जातील" असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

close