सत्यम प्रकरणी आंध्र सरकारवर चंद्राबाबूंचे ताशेरे

January 13, 2009 1:38 PM0 commentsViews: 3

13 जानेवारी, हैदराबादसत्यम घोटाळ्याला आंध्रप्रदेशमधलं रेड्डी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. रेड्डी यांनी कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन राजू परिवाराचं हित जपल्याचा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे.सिंचनापासून मेट्रो रेल्वेपर्यंतचे कोट्यवधींचे प्रकल्प 'मेटास' कंपनीला देण्यात आल्याचाआरोपही चंद्राबाबूंनी केला आहे. चंद्राबाबूंच्या या आरोपांमुळं सत्यम घोटाळ्याचे संबंध राजकीय व्यक्तींशी असल्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे. यावर काँग्रेसनं मौन बाळगलं असलं तरी चंद्राबाबूंवर आरोप केलाय रिपाई नेते रामदास आठवले यांनी. 2003 मध्येच घोटाळ्याची आपल्याला माहिती असल्याचं आठवले यांनी सांगितलं. सत्यमच्या घोटाळ्यावरून चंद्राबाबूंनी राजकीय वादाला तोंड फोडलं असलं तरी, चंद्राबाबूंच्याच सत्ताकाळात सत्यमची भरभराट झाली होती याचा मात्र त्यांना सोयिस्करपणे विसर पडला आहे.

close