‘मोदी पंतप्रधानपदासाठी निवडले तर जेडीयूने युती तोडावी’

June 15, 2013 1:56 PM1 commentViews: 728

नवी दिल्ली 15 जून : भाजप आणि संयुक्त जनता दलामधली युती तुटू नये यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. आणि युती टिकवण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करा असा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं जेडीयूसमोर एक फॉर्म्युला ठेवलाय. आताच युती तोडू नका नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवडलं गेलं तर युती तोडू असा ठराव मंजूर करा असं भाजपनं जेडीयूला सांगितल्याचं समजतंय.

modi vs nitishkumar

तर, मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील, अशी घोषणा भाजपने करावी. युती टिकवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असं नितीशकुमारनी राजनाथ सिंहांना सांगितल्याची माहिती आहे. पण युती तोडण्याबाबत अजून अंतिम निर्णय नाही. संध्याकाळच्या बैठकीत निर्णय घेऊ, भाजपसमोर कोणतीही अट ठेवलेली नाही. अशी माहिती जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिलीय.पण 17 वर्षांची युती तोडण्याची नितीशकुमारांची इच्छा असल्याचं समजतंय.

दरम्यान,जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची आज संध्याकाळी पाटण्यामध्ये बैठक होतेय. त्यात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बिहार भाजपचे नेते सुशील मोदी आणि नंदकिशोर यादव यांनी नितीशकुमारांची भेट घ्यायला नकार दिला. जेडीयूच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावं असं त्यांनी सांगितलं.

  • ninad14312

    cant read clearly…

close