शाळेच्या पहिला दिवशी मिळणार खेळणी आणि खाऊ !

June 15, 2013 4:59 PM0 commentsViews: 383

school dayपुणे 15 जून : 17 तारखेपासून राज्यभरातल्या शाळा सुरु होत आहेत. पण शाळेत पहिलं पाऊल ठेवणार्‍या चिमुरड्यांसाठी हा दिवस रडारडीचा असतो. यासाठी पुणे शिक्षण विभागानं शाळेचा पहिला दिवस अगदी स्पेशल करण्याचं ठरवलंय. प्रत्येक शाळांमधून मुलांचं स्वागत केलं जाणार आहे ते फुलं आणि खाऊ देऊन.

काही ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना छानशी खेळणी दिली जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणचे लोकप्रतिनिधी तसंच शासकीय अधिकारी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेमध्ये हजर राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण संचालक महाविर माने यांनी ही माहिती दिली.

close