शहीद अशोक कामटेंच्या पत्नीचं मनोगत

January 13, 2009 4:59 PM0 commentsViews: 8

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद पोलिस अधिकारी अशोक कामठे यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी कामटेंच्या पत्नी विनिता यांनी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली आहे. 26/11 च्या रात्री नेमकं काय घडलं याचा शोध घेण्यासाठी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतल्याचं विनितांनी म्हटलंय. कसाबला कामटेंची गोळी लागलेली आहे, हेही पोलिसांनी सांगायला नकार दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. " माझे पती शूर होते, हे मला ठाऊक आहे. ते जगालाही ठाऊक आहे. जेव्हा त्यांना गोळी लागली तेव्हा ते 40 ते 45 मिनटं विव्हळत पडले होते. गाड्या बाजूनं जात होत्या पण जखमी अधिका-यांच्या मदतीसाठी मात्र वेळीच कोणी धावून आलं नाही. जर आले असते.तर कोड्याचा उलगडा झाला असता. " असं विनिता कामटे म्हणाल्या. शहीद अशोक कामटेंच्या पत्नींचं मनोगत ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close