प्रदेशाध्यक्ष जाधव, कार्याध्यक्ष आव्हाड

June 15, 2013 6:27 PM0 commentsViews: 496

BHASKAR JADHAV and awahadमुंबई 15 जून : मुलामुलीच्या शाही लग्न सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी ओढावून घेणार्‍या भास्कर जाधव यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय.राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादीत एक नवं पद तयार करण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवडण्यात आलंय. यानिमित्ताने राष्ट्रवादीला तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच पवारांनी 6 नेत्यांचं एक सल्लागार मंडळ स्थापन केलंय. हे मंडळ अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना सल्ला देण्याचं काम करेल.

आयबीएन-लोकमतशी बोलताना काही महिन्यांपूर्वी पवारांनी भास्कर जाधव यांनी मुलाच्या लग्नात केलेल्या उधळपट्टीवर टीका केली होती. या घटनेमुळे आपल्याला रात्रभर झोप लागली नसल्याचं ते म्हणाले होते. आता त्याच पवारांनी जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केलीय.

‘आरोपांमुळे अस्वस्थ होऊ नका,काम करत राहा’

आरोप आणि तक्रारींमुळे अस्वस्थ होऊ नका, कामे करीत राहा या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण केली. शुक्रवारी नाशिकमधल्या उड्डाणपुलाचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्यावरही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप विरोधी पक्ष करीत होते, मात्र त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी पुढे त्यात तथ्य नसल्याचं सांगितल्याची आठवण त्यांनी करून दिली.

close