आधी टीका, आता टिळा !

June 15, 2013 6:44 PM0 commentsViews: 647
sharad pawar on jadhav

‘आधी टीका,आता टिळा’

मुंबई 15 जून : मुलामुलीच्या शाही लग्न सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी ओढावून घेणार्‍या भास्कर जाधव यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय.राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादीत एक नवं पद तयार करण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवडण्यात आलंय. यानिमित्ताने राष्ट्रवादीला तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच पवारांनी 6 नेत्यांचं एक सल्लागार मंडळ स्थापन केलंय. हे मंडळ अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना सल्ला देण्याचं काम करेल.

 

आपल्या मुलांच्या लग्नात भास्कर जाधव यांनी उधळपट्टी केली होती, तेव्हा आयबीएन-लोकमतशी बोलताना शरद पवारांनी जाधव यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. अशा लोकांनी सार्वजनिक जीवन सोडून इतर पर्यायांचा विचार करावा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारलं होतं. पण त्यानंतर चारच महिन्यांत.. त्याच जाधवांना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं.. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली.

close