नांदेड महसूल कार्यालयास कोर्टाची स्थगिती

January 13, 2009 3:42 PM0 commentsViews: 6

13 जानेवारी, औरंगाबादनांदेडमध्ये जाहीर केलेल्या महसूल आयुक्तालयाला आव्हान देणार्‍या तीन याचिका औरंगाबाद खंडपीठासमोर सादर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन याचिकांवरची सुनावणी पंधरा जानेवारीला होईल. तोपर्यंत नांदेड येथे विभागीय आयुक्तालय करण्याची कार्यवाही करू नये असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.लातूर इथं 22 कार्यालयं एकाच ठिकाणी व्हावीत म्हणून कोट्यावधी रुपये खर्चून इमारत बांधण्यात आली आहे. शिवाय सरकारने यापूर्वी नांदेड आणि लातूरमध्ये काही विभागीय कार्यालयं सुरू केली आहेत. पण लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून मागणी होत असताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकतर्फी निर्णय घेतला. हा निर्णय घेताना वैधानिक नियमांचे पालन केले गेले नाही अशी याचिका लातूरच्या ऍड. समद पटेल आणि ऍड. उदय गवारे यांनी सादर केलीय. या याचिकेवर 15 सुनावणी होईल. तोपर्यंत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी विनंती औरंगाबाद खंडपीठानं मान्य केली आहे.

close