भारत -पाक मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय

June 15, 2013 6:57 PM0 commentsViews: 171

india vs pak matchइंग्लंड 15 जून : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रसिस्पर्धी आमने सामने आहेत. पण क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असलेल्या या मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. त्याआधी भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला पहिली बॅटिंग दिली.

मॅचच्या तिसर्‍याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला पहिला धक्का बसला. भुवनेश्‍वर कुमारनं ओपनर नासीर जमशेदची विकेट घेतली. यानंतर कामरान अकमल आणि मोहम्मद हाफीजनं सावध बॅटिंग करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला.

पण भुवनेश्‍वरन हाफीजची विकेट घेत ही जोडी फोडली. तर स्पीन बॉलर आर अश्विननं कामरान अकमलचा अडसर दूर केला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 70 रन्सवर 3 विकेट झाली असतानाच पावसानं हजेरी लावली आणि खेळ थांबवण्यात आला.

close