पेट्रोल 2 रूपयांनी महागले

June 15, 2013 7:12 PM0 commentsViews: 287
petrol price hike

पेट्रोल 2 रूपयांनी महागले

15 जून : पेट्रोल दरवाढीपासून काही दिवस झालेली सुटका अखेर संपली आहे. पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रूपयांची झालेली ऐतिहासिक घसरणीमुळे ही दरवाढ करण्यात आली.

मार्च आणि एप्रिल महिन्यात 15 दिवसांच्या अंतराने पेट्रोलच्या दरात तब्बल 8 रूपये 25 पैशांची कपात करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच आंतराष्ट्रीय बाजारात रूपयांने नीच्चांक दर गाठला त्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात येईल असे संकेत पेट्रोलियम कंपन्यांनी दिला होता.

रूपयाचा भाव घसरल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दररोज कोट्यावधी रूपयांचा तोटा सहन करावा लागतोय. अखेर आज पेट्रोलच्या दरात 2 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

close