चिंटू पोरका झाला..प्रभाकर वाडेकर यांचं निधन

June 15, 2013 8:15 PM0 commentsViews: 1049
prabhakar wadekar + chintoo

प्रभाकर वाडेकर यांचं निधन

पुणे 15 जून : लेखक, अभिनेते प्रभाकर वाडेकर यांचं आज पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं ते 56 वर्षांचे होते. सकाळ वृत्तपत्रात येणार्‍या ‘चिंटू’ या कार्टूनचं लिखाण वाडेकर करायचे..चारुहास पंडित चित्र काढायचे आणि चिंटूला शब्द प्रभाकर वाडेकर द्यायचे.

अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी अभिनय आणि लेखनही केलं होतं. चिंटूवर ‘चिंटू 1′ आणि ‘चिंटू 2′ चित्रपटही झाले. ते दोन्ही चित्रपट लोकप्रिय झाले. तसंच चिंटू हा संकेस्तळाच्या माध्यमातूनही भेटीला आला होता.

दररोज सकाळ वृत्तपत्रातून चिंटू प्रसिद्ध व्हायला. लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वजणांना चिंटूची सवय झाली होती. पण वाडेकर यांच्या जाण्याने आज चिंटू अबोल झालाय…पोरका झाला.

 

 

close