कोल्हापुरात ‘सिरिअल किलर’!

June 15, 2013 1:22 PM0 commentsViews: 163

KOL MURDER.transfer15 जून : कोल्हापूर शहर पुन्हा एकदा साखळी खुनांनी हादरुन गेलंय. मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञाताची डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आलीय. गेल्या 2 महिन्यांमधली ही 8 वी घटना आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख अजून पटली नाहीय. आणि हत्येचं कारणही समजू शकलेलं नाहीय.

रेल्वे स्टेशनजवळच्या पारीख पुलाजवळ ही घटना घडलीय. आतापर्यंत या परिसरामध्ये 8 हत्या झाल्यात. या सगळ्या हत्या एकाच पद्धतीने म्हणजेच डोक्यात दगड घालून करण्यात आलेत. 2 दिवसांपूर्वीच म्हणजेच गुरुवारी स्टेशन समोरही अशाच पद्धतीने एक हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा खून झालाय.

दरम्यान हे हत्यासत्र म्हणजे सिरिअल किलिंग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र पोलीस त्याला दुजोरा देत नाहीयत. त्यामुळे आता कोल्हापूर पोलिसांसमोर या सगळ्या खूनाचं रहस्य शोधण्याचं आव्हान असणाराय.

close