भारतीय क्रिकेट टीम फेब्रुवारीत श्रीलंका दौर्‍यावर

January 13, 2009 4:07 PM0 commentsViews: 1

13 जानेवारीभारतीय क्रिकेट टीम पुढच्या महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौर्‍यात भारतीय टीम पाच वन डे मॅच खेळणार आहे. यातल्या तीन मॅच कोलंबोला आणि दोन दंबुला इथं खेळवण्यात येतील. टीमचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यामुळे पुढचे दोन महिने भारतीय टीम कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच खेळत नाहीये. त्यामुळे या रिकाम्या वेळेत एखादा छोटेखानी दौरा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न होता. दोन्ही देशांची बोर्ड गेले काही दिवस दौर्‍याचा कार्यक्रम ठरवण्याच्या दृष्टीने चर्चा करत होती. आणि अखेर आज हा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

close