पाकिस्तानात शक्तिशाली बॉम्बस्फोट, 13 ठार

June 15, 2013 11:07 PM0 commentsViews: 405

pak blastक्वेट्टा 15 जून : पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये शनिवारी संध्याकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय आणि 20 लोक जखमी झाले. बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहारातल्या महिला विद्यापीठाजवळ एक बॉम्बस्फोट झाला.

 

जखमींना ज्या रूग्णालयात नेण्यात आलं, त्या रूग्णालयात दुसरा स्फोट झाला. पहिला स्फोट विद्यापीठाजवळ उभ्या असलेल्या एका बसमध्ये झाला. यात अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतलीय.

close