भारताची विजयी हॅट्ट्रिक, पाकचा खेळ खल्लास

June 16, 2013 12:08 AM0 commentsViews: 1117
india win

भारताची विजयी हॅट्ट्रिक, पाकचा खेळ खल्लास

जून 15 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयाची हॅट्‌ट्रीक साधत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 8 विकेटनं मात करत लीगमध्ये अपराजीत राहण्याचा मान पटकावला आहे. भारताच्या दमदार बॉलिंगसमोर पाकिस्तानची टीम 165 रन्सवर ऑलआऊट झाली. असद शफीकच्या 41 रन्स वगळता पाकिस्तानचे इतर बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले. भारतीय बॉलर्सच्या दमदार बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणारी पाकिस्तानची टीम अवघ्या 165 रन्सवर ऑलआऊट झाली.

 

पण डक वर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतासमोर विजयासाठी 167 रन्सचं सुधारित आव्हान आहे. पावसामुळे मॅच प्रत्येकी 40 ओव्हर्सची करण्यात आली होती. अशद शफीकचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. भारतातर्फे आर अश्विन, रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा आणि भुवनेश्‍वर कुमारनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

 

पाकिस्तानच्या आव्हानाला उत्तर देताना भारतानं दमदार सुरुवात केली. पण पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं भारतासमोर 22 ओव्हरमध्ये 102 रन्सचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. हे माफक आव्हान भारतानं 2 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. स्पर्धेत सलग दोन सेंच्युरी करणार्‍या शिखर धवननं सर्वाधिक 48 रन्स केले. भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. तर पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव ठरला.
पाक टीमवर अख्तर नाराज

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान टीमला सलग तिसरा पराभव पत्करावे लागल्यानं पाकचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका करण्यात येतेय. आता यामध्ये पाकिस्तानचाच क्रिकेट शोएक अख्तरचीही भर पडलीय. पाक टीममध्ये अनेक क्रिकेटपटू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं शोएब अख्तरनं म्हटलंय. पाक टीममधले बरेचसे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत नाही. कारण ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. यासाठी त्यानं कोचलाही जबाबदार धरलंय. खेळाडूां केवळ प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर खेळाडूंच्या मनातून भिती काढून टाकण्याचं काम कोचनं करायला हवं असं अख्तरचं म्हणणं आहे. पाक क्रिकेटपटूंना ड्रेसिंग रुममध्ये एकसंध ठेवण्यासाठी नव्या प्रशिक्षकाची गरज आहे असंही त्यानं म्हटलंय. कठीण परिस्थितीतून पुढे येण्याची ताकद पाकनं दक्षिण आफ्रिका टीमकडून घ्यायला हवी असं मतही अख्तरनं म्हटलंय.

close