गोंदियातल्या राईस मिल संकटात

January 13, 2009 1:12 PM0 commentsViews: 7

13 जानेवारी, गोंदियादेशात सर्वाधिक धानाचं उत्पादन घेणार्‍या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बॉईल राईसचं उत्पादन होतं. पण, आठ दिवसांपूर्वी अचानक सरकारनं बॉईल राईस खरेदी बंद केली. त्यामुळे शेकडो राईस मिल संकटात सापडलेत. गोंदिया जिल्ह्यात400 च्या वर राईस मिल्स आहेत. दररोज जिल्ह्यात पाच हजार टन बॉईल राईसच उत्पादन होतं. या उद्योगावर जिल्ह्यातले 20 हजारावर कामगार अवलंबून आहेत. पण सरकारनं अचानक तांदळाची खरेदी बंद केल्यानं परिस्थिती अवघड बनली आहे.

close