अखेर जेडीयूचा भाजपला रामराम

June 16, 2013 5:53 PM1 commentViews: 746
bjp jdu

अखेर जेडीयूचा भाजपला रामराम

पटना 16 जून : अखेर जेडियू आणि भाजपची मैत्री संपुष्टात आली आहेत. जेडीयूने भाजपसोबत असलेली 17 वर्षांची यूती तोडली आहे. पटनामध्ये जेडीयू अध्यक्ष शरद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती तोडत असल्याची घोषणा केली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

आम्ही भाजपसोबत गेली 17 वर्षंसोबत होतो. आम्ही युती टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण आम्ही आमची ध्येय-धोरणं बदलू शकत नाही. पण आता भाजपने जो मार्ग निवडला आहे तो योग्य नाही. एनडीए आपल्या राष्ट्रीय अजेंड्यापासून भटकली आहे, त्यामुळे जेडीयूने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं शरद यादव यांनी स्पष्ट केलं.

आता जर भाजपसोबत आम्ही राहिलो असतो तर त्यांच्यासोबत राहणं मुश्किल झालं असतं. त्यांनाही याचा फायदा झाला नसता आणि आम्हालाही झाला नसता. त्यामुळे ही युती तुटणे हाच शेवटचा पर्याय राहिला होता असं यादव यांनी स्पष्ट केलं.

तर युती तोडण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला पण ही युती तुटणे हे योग्यच झालं असं नीतिशकुमार यांनी सांगितलं. नितीशकुमार यांनी 19 जून रोजी विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं आहे. त्यादिवशी विश्वासदर्शक ठराव आणतील.

तर शरद यादव यांनी भाजपसोबत युती तुटल्यानंतर एनडीएच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार आहे. जेडीयूच्या निर्णयावर भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी जेडीयूसोबत युती तुटणे ही दूदैर्वी घटना आहे अशी प्रतिक्रिया दिली.

 

  • parrag sudame

    याचा उलटा फायदा भाजपला होईल हे निश्चित ..
    मोदि आता जोरदार मोर्चेबांधणी करतील.

close