केंद्रीय कॅबिनेटमध्ये आज फेरबदल,मल्लिकार्जुन खर्गे नवे रेल्वेमंत्री ?

June 17, 2013 2:50 PM0 commentsViews: 498

cabinetनवी दिल्ली 17 जून : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल होतोय. संध्याकाळी साडेपाच वाजता चार कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. सिसराम ओला, गरीजा व्यास,ऑस्कर फर्नांडिस, के.एस. राव यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली जाणार आहे.

तर माणिकराव गावित, संतोष चौधरी, जे.डी. सीलम आणि इ.एन. नचिअप्पन हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मल्लिकार्जुन खरगे यांना रेल्वेमंत्रालय मिळण्याची अपेक्षा आहे तर सुशीलकुमार शिंदे यांच्या खातेपालटाची धूसर शक्यता आहे. ओला यांच्याकडे कामगार खात्याचा कारभार जाऊ शकतो तर गिरीजा व्यास यांच्याकडे गृहनिर्माण खाते दिले जाऊ शकते.

अशोक चव्हाणही सरसावले

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाडातून पुढाकार घेण्यास तयार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीय्. आदर्श प्रकरणात मुख्यमंत्रीपद गेल्यानं चव्हाण काही काळ मुख्यप्रवाहापासून अलिप्त आहेत. विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानं मराठवाड्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय ही पोकळी भरुन काढण्यासाठी चव्हाण यांनी संकेत दिलेत.

close