पुण्यातील तरुणी कौटुंबिक अत्याचाराची शिकार

January 13, 2009 1:15 PM0 commentsViews: 31

13 जानेवारी, पुणेनितीन चौधरीकौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचा फक्त विवाहीत महिलांकडूनच आजवर वापर झालाय. तसा समजही रुढ आहे. पण पुण्यात एका अविवाहित मुलीनं आपल्याच घरच्यांकडून होणार्‍या अत्याचाराविरोधात या कायद्याचा आधार घेतलाय. अशा प्रकारची ही पहिलीच केस आहे.पुण्यातील 24 वर्षीय तरुणीनं तिच्या मनाविरुद्ध घेतलेल्या निर्णयाविरोधात तिच्या वडिलांना थेट कोर्टात खेचलंय. सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या या मुलीचं लग्न पारंपरिक पद्धतीनं ठरवण्यात आलं. त्याला विरोध केल्यावर तिच्या वडील आणि भावानं तिला घरात बंद करून ठेवलं. तिनं कसबसं वकील असीम सरोदे यांच्या मदतीनं पोलिसांकडून स्वतःची सुटका करून घेतली. एखाद्या अविवाहित मुलीनं कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा आधार घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं तिचे वकील आसीम सरोदे यांनी सांगितलं. सॉफ्टवेअर प्रोफेशनल घडविणार्‍या मुलीच्या घरात आजही पंरपरेचे काजळ पांघरलं जातंय हेच पुरोगामी महाराष्ट्राचं दुदैर्व आहे. पण अशा रागिणींच्या विरोधातून हे काजळ धुवून निघेल अशी आशा सगळ्यांना वाटतेय.

close