नवी मुंबईत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

June 17, 2013 3:24 PM0 commentsViews: 292

ftg navi mum wall collapse.नवी मुंबई 17 जून : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईला चांगलेच झोडपलेय. नवी मुंबईत जोरदार पावसानं दोघांचा बळी घेतला. तुर्भेमधल्या इंदिरानगर भागात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. इथल्या महावीर वारी या खाणीची भिंत कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. यामध्ये आणखी एक जण जखमी झाला आहे.

 

जखमी मजुराला नवी मुंबईतल्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  मुसळधार पावसामुळे तुर्भे पोलीस ठाण्यातही पाणी साचलं होतं.

 

दरम्यान,मुंबई उपनगरात पाऊस आज विश्रांती घेताना दिसतोय.  रविवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचं वेळापत्रक पुन्हा सुरळीत झालंय. पावसामुळे खोळबंलेली रेल्वे वाहतूक पुन्हा ट्रकवर आली आहे. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाला.

close