बाळाच्या शोधासाठी आईची याचिका

January 13, 2009 1:18 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी, मुंबईसायन हॉस्पिटलमधून हरवलेल्या बाळाच्या शोधासाठी बाळाच्या पालकांनी मंुबई हायकोर्टात आज रिट याचिका दाखल केली आहे. तपास जलद गतीनं पूर्ण करण्याचे आदेश हायकोर्टाने द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. ही याचिका हेबीयस कॉर्पस स्वरुपाची आहे. त्यानुसार बाळाला कोर्टात हजर करावं अशी मागणी करण्यात आलीय. मोहिनी आणि मोहन नेरूरकर यांचं बाळ 1 तारखेला सायन हॉस्पिटलमधून चोरीला गेलं होतं. 13 दिवसांनंतरही हॉस्पिटल प्रशासन आणि पोलिसांना बाळ सापडलेलं नाही. बाळ चोरीला जाण्यामागे मुलं चोरणार्‍या रॅकेटचा हात असावा, असा संशयही नेरूरकर यांनी याचिकेत व्यक्त केलाय. याशिवाय, हॉस्पिटलमधून मुलं चोरी होण्याच्या प्रकाराची चौकशी एका उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी, असही या याचिकेत म्हटलंय.

close