मुंबई पालिकेचे कर्मचारी आणि रिक्षाचालक उद्या संपावर

June 17, 2013 1:28 PM0 commentsViews: 554

mumbai auto rickshawमुंबई 17 जून : मुंबईकरांना आज पावसाने दिलासा दिला असला तरी उद्या एक नवं संकट वाट पाहतंय. मुंबई महापालिकेचे 90 हजार कर्मचारी आणि बेस्टचे 20 हजार आणि रिक्षा युनियनचे चाळीस हजार रिक्षाचालक संपावर जाण्याची शक्यता आहे. कामगार नेते शरद राव यांनी सतरा तारखेच्या मध्यरात्रीपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला आहे.

 

महापालिकेच्या कर्मचार्‍यांचं थकीत वेतन द्यावं अशी मागणी राव यांनी केली आहे. तर रिक्षा आणि बेस्ट कर्मचार्‍यंाच्याही काही मागण्या आहेत. या मागण्या मान्य होत नसल्याचं सांगत शरद राव यांनी संपाचा इशारा दिलाय.

 

दरम्यान, पावसाळयाच्या तोंडावर रिक्षाचालकांनी नागरिकांना वेठीला धरू नये, असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तर संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिला.

close