सत्यमसाठी बेलआऊट पॅकेजचा विचार

January 13, 2009 4:54 PM0 commentsViews: 5

13 जानेवारीसत्यमच्या 53 हजार कर्मचार्‍यांच्या पगारासाठी केंद्र सरकार एक बेलआऊट पॅकेज देण्याचा विचार करत आहे. यासाठी दोन हजार कोटी रूपयांचं पॅकेज देण्याच्या प्रक्रियेवर सरकारनं विचार सुरू केल्याचं समजतंय. सत्यमला घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचं नव्या संचालक बोर्डानं म्हटलं होतं. त्यामुळं सध्या सत्यमच्या कर्मचार्‍यांना कुठल्याही पद्धतीची आर्थिक झळ पोहचू नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

close