चीनी मोबाईलवर लवकरच बंदी

January 13, 2009 4:58 PM0 commentsViews: 9

13 जानेवारी, मुंबईरुपाली शिंदेब्रंॅडेड मोबाईलपेक्षा स्वस्त असणारे चिनी मोबाईल आता बंद होणार आहेत. याचं कारण म्हणजे चीनी मोबाईल्समध्ये आयएमईआय नंबर दिलेला नसतो. या होणार्‍या बंदीने चायनीज मोबाईलच्या बाजारावर किती परिणाम होईल यावरचा हा एक रिपोर्टनोकियाचा म्युझीक एक्सप्रेस बाजारात मिळतो 14,000रुपयांना. पण चायनाचा म्युझीक एक्सप्रेस तुम्हाला मिळेल फक्त 3,500 रुपयांना. तसच नोकियाच्या एन-82 ची बाजारात किंमत आहे 19,000रुपय तर चायनाचा सायबर शॉट आहे फक्त 4,500 रुपयांना. हाच फरक चायनीज मोबाईलला जास्त मागणी मिऴवून देतो. पण लवकरच ह्या मोबाईल्सवर बंदी येणार आहे. कारण ह्या मोबाईल्सला आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेन्ट आयडेन्टिटी नंबर दिलेला नसतो. मोबाईल हरवल्यास आयएमआय नंबरच्या मदतीनं तो परत मिळू शकतो. मोबाईलचा आयएमईआय नंबर तुम्ही दोन प्रकारे पाहू शकता….तुमच्या मोबाईलवर डाईल करा *#06# तुमच्या स्क्रीनवर तो नंबर दिसेल किंवा तुमच्या बॅटरीच्या खाली तो असेल. चीनी मोबाईल मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांची विक्री झपाट्याने वाढत गेली. पण आता बंदी आल्याने विक्रेत्यांना फटका सहन करावा लागणार आहे. "गेले काही दिवस हे स्वस्त मोबाईल्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यांच्यावर बंदी आली तर आमच्या धंद्यावर नक्कीच परिणाम होईल" असं रविंद्र कांबळे या दुकानदारानं सांगितलं.चीनी मोबाईल्सची खासीयत म्हणजे त्याची जबरदस्त साऊंड कॉलीटी आणि स्वस्त किंमत. पण आता बंदीमुळे ग्राहकांना त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी खिशावर जास्त भार द्यावा लागणार आहे.

close