मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

June 17, 2013 6:04 PM0 commentsViews: 231

cm in pune schoolपुणे 17 जून : आज राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या शाळेचा हा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहे. पुण्याच्या येरवडामधल्या यशवंतराव चव्हाण विद्या निकेतनमध्ये चक्क मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

 

मुलांना गुलाबाची फुलं आणि चॉकलेट वाटण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यासोबतच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गा सोबत घेऊन त्यांना वर्गात प्रवेश केला.

 

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत
सोलापुरातल्या सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात आल्या. आजुबाजूला स्वागतपर फलक लावण्यात आले. त्याच बरोबर शाळेतल्या वर्ग खोल्यांना रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आलंय. शाळेचा आजचा पहिला दिवस असल्यानं पालकांच्या चेहर्‍यावरही आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. नव्या विद्यार्थ्यांच्या मनातली शाळेची भिती निघून जावी आणि त्यांच्या मनात शाळेची गोडी निमाण व्हावी यासाठी हे अभिनव स्वागत करण्यात आल्याचं शिक्षक सांगताहेत.

 

 

close