संप टळला, कर्मचारी-रिक्षाचालकांची माघार

June 17, 2013 5:28 PM2 commentsViews: 460

sharad raoमुंबई 17 जून : ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर संपाचं संकट टळलं आहे. आज मध्यरात्रीपासून सुरु होणारा पालिका कर्मचार्‍यांचा संप मागे घेण्यात आला आहे. बेस्ट बस आणि रिक्षाचालकांनीही संप मागे घेतला आहे.

 

त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन राज्यसरकारनं दिल्यानं हा संप मागे घेत असल्याची घोषणा कामगार नेते शरद राव यांनी केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई महापालिकेचे 90 हजार कर्मचारी आणि बेस्टचे 20 हजार आणि रिक्षा युनियनचे चाळीस हजार रिक्षाचालक संपावर जाणार होते.

 

शरद राव यांनी आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. महापालिकेच्या कर्मचार्‍यांचं थकीत वेतन द्यावं अशी मागणी राव यांनी केली होती.

  • Vijay Sonawane

    kay ro soda na bombay vallana

  • VINAYAK

    PETI MILALI VATATAY…….

close