गोंदियात 2 लाख क्विंटल धान सडलं

June 17, 2013 7:51 PM0 commentsViews: 243

GONDIA PADDY DECAYगोंदिया 17 जून : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात तब्बल 2 लाख 30 हजार क्विंटल धान सडतंय. राईस मिल असोसिएशन आणि सरकारमधल्या मतभेदामुळे हे धान सडतंय. राईस मिल असोसिएशनने धानाची भरडाई करण्यास नकार दिला आहे.

वाहतूक खर्च वाढवून द्या आणि मागील पाच वर्षांचे एकूण 25 कोटी रूपये द्या, नाहीतर हे धान उचलणार नाही अशी भूमिका राईस मिल असोसिएशनने घेतली आहे. पण पावसात भिजल्यामुळे हे धान आता भरडाईच्या लायकीचं राहिलेलंच नाही.

वाया गेलेल्या या धानाची किंमत 55 कोटी रुपये आहे. गेल्या तीन पावसाळ्यांपासून आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेलं धान जागेअभावी असंच सडतंय.या सडलेल्या धानाचा आसपासच्या परिसरात दुर्गंधही पसरलाय. यामुळे आजुबाजूला राहणार्‍या लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.

close