मुंबई मॅरेथॉनचं काउंट डाऊन सुरू

January 13, 2009 5:23 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी, मुंबईऋजुता सटवेसहाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय. येत्या अठरा जानेवारीला ही मॅरेथॉन होणार आहे. गेल्या महिन्यातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पुन्हा सावरलीय. आणि या मॅरेथॉनमधून आयोजकांना हाच संदेश द्यायचाय की 'मुंबई कीसिके लिये रुकती नही.'मुंबई मॅरेथॉनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे आयोजकांचा उत्साहही वाढलाय. दरवर्षी ही स्पर्धा मोठी आणि भव्य व्हावी यासाठी आयोजक प्रयत्न करतायत. फिटनेस आणि चॅरिटी हा तर मॅरेथॉनचा आत्मा. त्यासाठीच यंदा मॅरेथॉनसाठीचं रजिस्ट्रेशन नेहेमीपेक्षा सहा महिने आधी सुरू करण्यात आलं होतं. आयोजकांना पाठबळ मिळालंय ते मुंबईकरांच्या एकजुटीचं आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्याचं. ऑगस्टमध्येच मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी 35 हजार 450 लोकांनी आपली नावं नोंदवली होती. आणि विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतरही यातल्या एकानंही आपला सहभाग काढून घेतला नाही. अगदी परदेशी स्पर्धकांनीही मोठ्या प्रमाणार आपली नावं नोंदवली आहेत.या मॅरेथॉनचा संदेश असेल- 'मुंबई सुरक्षित आहे' आणि ब्रँड अँबेसिडर जॉन इब्राहिम स्पर्धकांचा उत्साह वाढवायला जातीनं हजर असेल. जागतिक मंदीचाही या मॅरेथॉनवर फारसा परिणाम झाला नाही. आशियातली ही सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन यंदा आणखी भव्य आणि मोठ्या स्वरुपात होणार आहे. बक्षिसाची रक्कम दहा हजार अमेरिकन डॉलरनी वाढलीय तर मॅरेथॉनमधून गोळा होणार्‍या चॅरिटीतही दोन कोटींची वाढ अपेक्षित आहे.

close