‘जास्त जेवण मागू नका’,आदिवासी खात्याचा अजब फतवा

June 17, 2013 2:04 PM0 commentsViews: 394

NSK_TRIBAL_417 जून : माध्यमांकडे तक्रारी करू नका, अन्नत्यागासारखी आंदोलनं करू नका, जास्त जेवण मागू नका…ही कोणत्याही कैद्यांना दिलेली ताकीद नाही, तर हा आहे आदिवासी विकास खात्याचा आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचा फतवा.

10 एप्रिलला आदिवासी विकास खात्यानं आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना यात काही अटी घालण्यात आल्यात.

त्यात वसतीगृहात राहात असताना कोणतंही आंदोलन करू नये, माध्यमांकडे तक्रारींचे निवेदन देऊ नये, गटबाजी करू नये, विशेष म्हणजे जास्त जेवण मागू नये आणि मागितलं तर मेस कॉन्ट्रक्टरशी हुज्जत घालू नये या धक्कादायक अटी विद्यार्थ्यांवर घालण्यात आल्या आहे.

या पाळल्या नाहीत तर या सर्व बाबी गैरवर्तन समजल्या जातील आणि वसतीगृहातला त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल अशी धमकी आदिवासी विकास विभागाने या जीआरमध्ये दिली आहे.

close