गडचिरोलीत नक्षलवाद्यांसाठी पुनर्वसन योजना

January 13, 2009 2:32 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी, गडचिरोलीसतीश त्रिनगरीवारमागच्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्याच्या आत्मसमर्पण मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.अशाच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना जीवनाचा आनंद मिळावा म्हणून पोलीसांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे.सध्या पोलीस अधिकार्‍यांसोबत संगीताच्या तालावर नाचणारा मासा तलांडी काही वषांर्पूर्वी नक्षलवाद्यांच्या दलमचा सदस्य होता. तेथे पोलिसांच्या विरोधी गाणं तयार करण्याचं त्याच्याकडं काम होतं. पण आत्मसमर्पण झाल्या नंतर तर त्याचं आयुष्यच बदलून गेलं. "हे आयुष्य खूप शांत आणि चांगलं आहे. मला खूप छान वाटतंय" असं मासा तलांडी यानं सांगितलं.श्री श्री रवी शंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यक्रमात या सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्सलवाद्यांसोबतच पोलिसांनाही रोजच्या दडपणातून बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यांनीही नाचगाण्यानं आपल्यावरचं दडपण कमी केलं.एक आठवड्याच्या या कार्यक्रमात गडचिरोली एसपी पासून ते कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनीच आपल्या कला गुणांचा परिचय दिला. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या चेहर्‍यावरचं हसू पाहिलं, तर इतर नक्षलवाद्यांनाही हेवा वाटेल आणि तेही आत्मसमर्पणाचा विचार करतील.

close