बेस्टच्या इंधन अधिभारात वाढ

January 13, 2009 8:35 AM0 commentsViews: 3

13 जानेवारी, मुंबईबेस्टच्या वीज ग्राहकांना येत्या महिन्यात थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. बेस्टनं वीजबिलात वसूल केला जाणारा इंधन अधिभार म्हणून महावितरणकडे 350 कोटी रुपये जमा केलेत. हा इंधन अधिभार ग्राहकांकडून 1 रुपया 15 पैसे प्रति युनिट या दरानं वसूल केला जातो. पण गेल्या सहा महिन्यांपासून बेस्टनं हा अधिभार फक्त साठ पैसे प्रति युनिट याच दरानं वसूल केला होता. आता येणार्‍या विजबिलात ग्राहकांकडून 91 पैसे प्रतियुनिट या दरानं उरलेली थकबाकी वसूल केली जाणार आहे. या थकबाकी अंतर्गत बेस्टला ग्राहकांकडून एकूण 168 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे.

close