ट्राय सीरिजसाठी भारतीय टीम ‘जैसे थे’

June 17, 2013 10:39 PM0 commentsViews: 584

Caribbean tri-series indian team17 जून : वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या ट्रँग्युलर सीरिजसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. या सीरिजसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत येत असलेली भारतीय टीमच कायम ठेवण्यात आली आहे.

कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय बॅटिंगची मदार असेल ती शिखर धवन, सुरेश रैना, विराट कोहली आणि मुरली विजय यांच्यावर. तर आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अमित मिश्रा या तिघांवर स्पीन बॉलिंगची मदार असेल.

28 जूनपासून सुरु होणार्‍या या सीरिजमध्ये भारतासह यजमान वेस्टइंडिज आणि श्रीलंका या दोन टीमचा समावेश आहे.

close