कोल्हापुरात सीरिअल किलरची दहशत !

June 17, 2013 10:58 PM2 commentsViews: 667

kolhapur ciriyal killerसंदीप राजगोळकर,कोल्हापूर

17 जून : कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून साखळी खून विशिष्ट पद्धतीनं होत आहे. गेल्या 2 महिन्यांत शहरात 8 खून झालेत. त्यातले 6 खून सीरियल किलिंग असल्याची चर्चा आहे.

शहरातला रेल्वे स्टेशन परिसर…याच परिसरात सध्या सीरियल किलरनं धुमाकूळ घातलाय. गेल्या 2 महिन्यांत या भागात डोक्यात दगड घालून 6 खून करण्यात आलेत …त्यामुळे शहरात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा….मात्र त्यांच्या जिल्ह्यातलं पोलीस दल निष्क्रिय झाल्याचा आरोप शिवसेना करतेय. तसंच पोलीस तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात येतोय.

रेल्वे स्टेशन भागात झालेले खून सीरियल किलिंगचा प्रकार नसल्याचा दावा पोलीस करत आहेत. मात्र ज्यांच्या खून झालाय त्या व्यक्तींकडे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळलेली नाही त्यामुळे शहरातील हे खून नेमक्या कोणत्या कारणांसाठी होताहेत याच उत्तर मात्र कोणाकडेच नाहीय.

  • Prasad Bapat

    याचा अर्थ कोल्हापूरच्या रस्त्यांवर सी सी टी व्ही केमेरे बसवलेले नाही आहेत. उद्या जर दहशतवादी हल्ले किवां बॉंबस्फोट झाले तर काय करणार आहेत ?

  • Nachiket

    अहो बापट… कोल्हापुरात कोण मारायला बोंब स्फोट करायला जाणारे…??

    मुंबई, पुणे.. फार फार तर नागपूर… ह्याच्यावर महाराष्ट्र संपतो.. तुमच्या- आमच्या सारख्या छोट्या शहरात राहणाऱ्यांची काय कथा..??

    (साधा हिशोब.. ज्या शहरात बहु-भाषिक/बहु-प्रांतिक लोक जास्त आहेत.. ती शहरे तिथल्या विविध प्रांतांच्या रहिवासी लोकांमुळे..देशाच्या इतर भागांशी थेट जोडलेली असतात.. त्यामुळे अशा शहरात बॉम्बस्फोट/ दहशतवादी हल्ले झाल्यावर त्याचे पडसाद देशभर उमटतात.. लहान सहान शहरात असे हल्ले करून कशी मिळणार एवढी प्रसिद्धी दहशतवाद्यांना..? आणि प्रसिद्धी नाही मिळाली.. तर लोकांच्या मनात दहशत कशी निर्माण होणार.. आणि दहशत निर्माण नाही झाली तर बॉम्बस्फोट करून काय उपयोग..? त्यामुळे आपण निदान दहशतवादाच्या हेशेबात तरी सुरक्षित आहोत..!!)

close