26 / 11 च्या साक्षीदार घरी परतल्या

January 14, 2009 5:51 AM0 commentsViews: 4

14 जानेवारी, मुंबईसुधाकर कांबळेमुंबईतल्या 26 / 11 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींना पाहणा-या अनिता उडीया ह्या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. पण आता त्या घरी परतल्या आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. तेथे त्यांनी सहा दहशतवाद्यांना ओळखलं होतं. पण त्यानंतर अनिता यांची मुलगी, सीमा जोशी यांनी अनिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती . दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी अनिता यांनी दहशतवाद्यांना एअरबोट सोडतांना पाहलं होतं.ज्यावेळी दहशतवादी बधवार पार्कजवळ उतरले त्यावेळी अनिता उडीया यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण फिल्मची शुटींग चालू आहे असं सांगुन त्यांनी अनिता उडीयांना चकमा दिला. त्यांच्या बेपत्ता होण्याचं गुढ वाढलं होतं. दहशतवाद्यांना मदत करणारे काही लोक मुंबईत अजुनही आहेत अशीच शंका त्यामुळे येतेय त्यांच्या बेपत्ता होण्यानं मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला चांगलाच झटका बसला होता. पण अनिता उडिया यांच्या घरी परतण्यानं दहशतवादी हृल्ल्याच्या तपासाला वेग मिळणार आहे. अनिता उडिया पहाटे दीड वाजता घरी परतल्या आहेत. त्यांना पोलीस व्हॅन मधून घरी सोडण्यात आलं, असं प्रत्यक्षदर्शी त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. उडिया यांच्या अचानक गायब होण्यानं गुढ वाढलं होतं. त्यांना पोलिसांनी लपवून ठेवलं होतं की त्यांचं खरोखरोच कोणी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, याविषयी अधिकच शंकेचं सावट आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्या साक्षेबद्दल त्यांनी कोर्टात हजर करणार आहेत की नाही याबद्दलही प्रश्न चिन्ह आहे.

close