अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात घोटाळा ?

June 17, 2013 11:06 PM0 commentsViews: 442

anna bhusathe mandalउदय जाधव,मुंबई.
17 जून : महाराष्ट्रातील सर्व महामंडळांच्या कारभारावर नेहमीच प्रश्नं उपस्थीत केले जातात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात गैर कारभार सुरू असल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनीच केलांय.

मातंग समाज आणि तत्सम पोटजातींचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र या महामंडळाचा कारभार पारदर्शी नसल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनीच केला.

मात्र कदम यांच्याच विरोधात तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये महामंडळाकडून व्यावसायासाठी अनेक निधी मिळवलेल्या अरुणा मिसाळ या महिलेने कदम यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. आणि याच महिलेवर औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तेरा गुन्हे दाखल आहेत.

राज्य सरकारने महामंडळांची स्थापना उपेक्षित समाजाच्या विकासासाठी केली. पण योजनांचा निधी गरजूंना देण्याऐवजी त्याचा गैरवापर करणार्‍यांच्या विरोधात सरकार आता तरी कारवाई करणार आहे का…?

close