हुबळी कोर्टातल्या स्फोटात कट्टरवाद्यांचा हात ?

January 14, 2009 6:11 AM0 commentsViews: 6

14 जानेवारी, हुबळी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग आणि स्वामी दयानंद पांडे यांना अटक करण्यात आली आहे. आता देशाच्या इतर भागातही हिंदू कट्टरवाद वाढीस लागत असल्याचं दिसतं आहे. हुबळी कोर्टाच्या आवारात मे 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आलीय. याचा संबंध हिंदू कट्टरवादाशी असल्याचं बोललं जात आहे. मे 2008 मध्ये हुबळी कोर्टाजवळ झालेल्या स्फोटात सीमीचा हात असल्याचा संशय होता. पण, आता या प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलंय. हिंदू कट्टरवाद्यांचा यात हात असल्याचं बोललं जातंय. नागराज जंबागी या गुंडाच्या सात सदस्यांच्या गँगनं या स्फोटाची जबाबदारी घेतलीय. प्रत्यक्षात अनेक खून आणि अपहरण प्रकरणात जंबागीला अटक करण्यात आली होती. " हुबळी कोर्टातल्या स्फोटात कोणत्या कट्टरवाद्यांचा हात आहे, मला नक्की ठाऊक नाहीये. आता फक्त मी एवढंच सांगू शकेन की, ती एक गुन्हेगारी टोळी आहे, " अस कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. व्ही. एस. आचार्य यांचं म्हणणं आहे. रामसेनाकडून वर्षभरापूर्वी घेतलेल्या दहशतवादी कॅम्पची ही चित्रं आहेत. भगवान रामच्या नावाखाली चालणार्‍या या स्वयंघोषित आर्मीचा संस्थापक प्रमोद मुतालीक नावाचा हा कट्टरवादी आहे. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देत असल्याचा दावा या ग्रुपनं केलाय. दरम्यान, पोलिसांनी मात्र या प्रकणावर फारसं बोलायला नकार दिला आहे. याविषयी कर्नाटकचे पोलीस महासंचालक आर. श्रीकुमार यांना विचारलं असता त्यांनी सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. तर कोर्टात येणार्‍या सीमीच्या सदस्यांना लक्ष्य करण्याचा हेतू होता, अशी कबुली हुबळी कोर्टाच्या आवारात स्फोट घडवून आणणा-या गँगनं दिली आहे.

close