उत्तराखंडमध्ये पावसाचं तांडव, बळीची संख्या 58 वर

June 18, 2013 2:53 PM0 commentsViews: 1968

utrakhand floods18 जून :18 जून :उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजलाय. ढगफुटी झाल्यानं केदारनाथ मंदीर पाण्याखाली गेलंय. केदारनाथाच्या मंदिराला पाण्यानं वेढलंय. मंदिर पाण्याच्या गाळात बुडालंय.

मंदिराच्या आसपासचा परिसर पूर्णपणे उद्धवस्त झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. या पूराच्या आपत्तीमध्ये आत्तापर्यंत 58 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, चारधाम यात्रेसाठी गेलेले जवळपास 70 हजार यात्रेकरु इथं अडकून पडले आहेत.

 

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळे उत्तराखंडच्या अनेक भागात मोबाईलचे टॉवर कोसळून संदेशवहन यंत्रणा कोलमडली आहे. पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.अडकलेल्या लोकांसाठी जवळपास 200 छावण्या उभारण्यात आल्यात. पावसामुळे चार धाम यात्रा स्थगित करण्यात आलीय. त्यामुळे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, आणि यमुनोत्रीमध्ये 70 हजार भाविक अडकून पडलेत.

उत्तरकाशी आणि रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाल्यानं इथे पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. हरिद्वारमधून जाणारी गंगेने धोक्याची पातळी ओलांडलीय. हरिद्वार येथे हेलिकॉप्टरच्या सतत फेर्‍या चालू आहेत. उत्तराखंडमध्ये जूनमध्ये झालेल्या या पावसानं गेल्या 88 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. डेहराडूनच्या हवामान खात्यानी सांगितलय की, सोमवारी डेहराडूनमध्ये 340 मिलीमिटरचा विक्रमी पाऊस झाला. राज्यातल्या अलकनंदा, मंदाकिनी, भागीरथी सारख्या मोठ्या नद्यांसह जवळपास सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय.

बसवर दरड कोसळली, 4 ठार

दरम्यान, उत्तराखंडात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहे. अलमोरामध्ये एका बसवर दरड कोसळुन चार जणांचा मृत्यू झालायं.तर डेहराडूनमध्ये घर कोसळ्यानं तीनजण मृत्युमुखी पडलेत.डेहराडुन लगतचे अनेक हायवे देखील ठप्प झाले आहेत. पावसाच्या तडाख्याने पिठोगडमधील घरांची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झालीयं. साठहून अधिक घर कोसळीत तर सगळ्या नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.

संपूर्ण उत्तर भारतात पावसाची सध्याची परिस्थिती कशी आहे ?

उत्तराखंड : आतापर्यंत 313 मिमी पाऊस
सरासरी पाऊस : 65.9 मिमी
यावर्षी आत्तापर्यंत 375 टक्के जास्त पाऊस झालाय

हिमाचल प्रदेश : आतापर्यंत 151.2 मिमि पाऊस
साधारण पाऊस : 37.8 मिमि
यावर्षी आत्तापर्यंत 300 टक्के जास्त पाऊस झाला
हरियाणा : आत्तापर्यंत 151.2 मिमि पाऊस
सरासरी पाऊस : 16.8 मिमि
यावर्षी आत्तापर्यंत 198 टक्के जास्त पाऊस

गंगेचा प्रवाह

उत्तराखंड, ऋषिकेष, देहरादून, लकसर, हरिद्वार, जोशीमठ, रूद्रप्रयाग, अलमोरा, हरियाणा, यमुनानगर, करनाल, दिल्ली

शासनातर्फे मदत

– उत्तराखंड इथे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना राज्य शासनातर्फे मदत
– मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आदेश
– दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक डेहरादूनला रवाना करण्यात आले आहे
– या कार्यालयातून महाराष्ट्रातील अडकलेल्या यात्रेकरूंना योग्या ती मदत केली जाणार आहे

अडकलेल्या प्रवाशांना मदत आणि माहितीसाठी

  • प्रदीप कुमार- 09868140663
  • जगदीश चंद्र उपाध्याय – 09818187793
  • मंत्रालयातही सुरू करण्यात आलंय आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र
  • 022 – 22027990 – 022 – 22816625 – 022 – 22854168
close