गॅस टँकरचा स्फोट,1 ठार

June 18, 2013 1:09 PM0 commentsViews: 511

KASARA_tankar blastकसारा 18 जून : शहापूरमध्ये मुंबई – नाशिक महामार्गावर आज सकाळी कसारा घाटाजवळ साईची खिंड इथं एच.पी. गॅसचा टँकर आणि कंटेनरचा अपघात होऊन त्यात गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा जळून मृत्यू झाला.

हा स्फोट एवढा भयंकर होता की टँकरचे जळून तुकडे झाले. त्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणारा मार्ग काही काळासाठी बंद करावा लागला. आता दोन्हीकडेचे मार्ग सुरू झाले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

close