भाजप -जेडीयू कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

June 18, 2013 1:29 PM0 commentsViews: 711

jdu bjp in bihar

18 जून : जेडीयूने एनडीएतून बाहेर पडल्यानंतर आज भाजपनं बिहार बंदचं आवाहन करत विश्वासघात दिवस पाळला. या बंदला नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. बंद दरम्यान पाटण्यात भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.

भाजपने काढलेल्या मोर्च्या दरम्यान जेडीयूच्या काही कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात नारेबाजी केली. त्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत जेडीयूचा कार्यकर्ता जखमी झाला. पाटण्यात दुकानं आणि कार्यालये बंद आहेत.भाजपनं आजच्या दिवसाला विश्यासघात दिवस असं म्हटलंय.

close