जखमी हत्तीणीसाठी मनसे सरसावली

June 18, 2013 5:30 PM0 commentsViews: 1182
MULUND HATTI1

जखमी हत्तीणीसाठी मनसे सरसावली

मुंबई 18 जून : मुलुंडमध्ये एक साठ वर्षाची बिजलीच्या नावाची हत्तीण जखमी अवस्थेत पडली आहे. वनविभागाचा हलगर्जीपणा आणि मालकाच्या हलगर्जीपणाची बळी ठरलेल्या बिजलीच्या मदतीसाठी आता मनसेसुद्धा पुढं सरसावलीय.

 

बिजलीवर ताबडतोब उपचार करून तिला तज्ञ डॉक्टरांच्या हाती सोपवावी अशी मागणी मनसेनं केलीय. असं केलं नाही तर वन अधिकारी आणि तिच्या मालकाला मनसे स्टाईलनं धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेचे उपविभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी दिलाय.

 

मुलुंड पूर्व इथल्या राजा इंडस्ट्रीयल इस्टेट इथं गेले आठ दिवस ही 60 वर्षांची बिजली मृत्यूशी झुंज देतेय. परराज्यातून वन्य प्राण्यांच्याआणण्यावर बंदी असतानाही असे प्राणी इथं आणले जातात आणि त्यांच्याकरवी पैसे गोळा केले जातात. यावर त्वरीत बंदी आणावी आणि जखमी बिजलीला प्राणीमित्रांच्या स्वाधीन करावं, जेणेकरून तिच्यावर योग्य ते उपचार केले जातील अशी मागणी अनिमल्स मॅटर टू मी या प्राणीमित्र संघटनेचे प्रमुख गणेश नायक यांनी केलीय.

close