कशी आहेत म्हाडाची घरं ?

January 14, 2009 12:26 PM0 commentsViews: 6

14 जानेवारी , मुंबई उदय जाधव मुंबईत म्हाडाने उपलब्ध केलेली घरं घेण्यासाठी, सध्या सर्वजण जीवाचा आटापीटा करतायेत. ज्या घरासाठी हे सर्व प्रयत्न चाललेत, ती घरं नेमकी आहेत तरी कशी ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. म्हाडाची घरं बांधून पूर्ण झालेली आहेत. म्हाडाने घरं बांधताना कोणत्याही उणीवा राहणार नाहीत, याची काळजी घेतल्याचं म्हाडाच्या बिल्डिंग पाहून लक्षात येतं. म्हाडानं बांधलेल्या वर्साेवामधली घरं सर्वात मोठी आहेत. त्यांचं क्षेत्रफळ सहाशे त्र्याणंव ते नऊशे सव्वीस स्क्वेअर फूट आहे. हॉल, किचन आणि बेडरुम असं सगळंच या घरांमध्ये आहे. म्हाडाच्या वर्सोवा इथल्या आलिशान घरातलं बाथरुम आणि टॉयलेट स्वच्छ असून ती इंग्लिश स्टाइलमधली आहेत. त्यामुळेच सगळ्यांच्या नजरा प्रामुख्याने वर्साेवातल्या घरांवर आहेत. मुंबईत म्हाडाने वर्साेवामध्ये साडेचारशेच्यावर फ्लॅट विकायला ठेवलेत. या एका थ्री आणि टू बीएचके फ्लॅटच्या किमती म्हाडाने पंचेचाळीस ते पंच्चावन लाख रुपये ठेवलीय. पण प्रॉपर्टी रेट नुसार इथल्या एका फ्लॅटची किंमत, दीड कोटी रुपये आहे. म्हाडानं मध्यम आणि अल्प उत्पनं गटांसाठीही चांगल्या दर्जाची घरं बांधली आहेत. या घरांमध्येही हॉल, किचन, बेडरुम आणि बाथरुम म्हाडाच्या इतर घरांसारखीच आहेत. पण ही घरं घेण्यासाठी येणारी अर्ज, 15 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 3 हजार 863 घरांचे भाग्यवान महिन्यानंतरच समजतील.

close